Thursday , April 23 2026
Breaking News

सहकाररत्न उत्तम पाटील चषक कागलच्या डेंजर बॉईज क्लबकडे

Spread the love

 

निपाणी संघ उपविजेता

निपाणी (वार्ता) : येथील गोसावी व मकवाने यांच्यावतीने कै. विश्वासराव शिंदेनगर येथील तिरंगा स्पोर्ट्स क्लबतर्फे आंदोलननगर आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात निपाणी ज्युनिअर स्पोर्ट्स क्लब व डेंजर बॉईज- कागल यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला. निपाणी जूनियर स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करीत ४९ धावा जमवल्या तर कागलच्या डेंजर बॉईज संघाने एक चेंडू राखून ५० धावा केल्यामुळे सहकाररत्न उत्तम पाटील चषक मिळवला. बक्षीस वितरण समारंभास नगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र शिंदे व मान्यवर उपस्थित होते.
विजेत्या कागल संघाला ३० हजार व चषक आणि उपविजेच्या निपाणी जुनियर स्पोर्ट्स क्लबला २० व चषक देण्यात आले. तृतीय क्रमांक मिळवलेल्या रॉयल स्पोर्ट्स १० हजार रुपये तर रेंदाळ स्पोर्ट्स क्लबला चतुर्थ क्रमांकाचे ७ हजार व चषक देण्यात आले. यावेळी मॅन ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॅट्समन व बेस्ट बॉलर अशी वैयक्तिक बक्षिसेही देण्यात आली.
माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनी, गोसावी समाजातील तरुण पिढीने अभ्यास व मैदानी खेळ खेळून गोसावी समाजाने मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास दीपक सावंत, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, इम्रान मकानदार, शेरखान यांच्यासह गोसावी समाज क्रिकेट असोसिएशन, तिरंगा स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वाळकी यात्रेत दानोळीच्या बंडा शिंदे यांची बैलगाडी प्रथम

Spread the love  बंडा खिलारे ठरले द्वितीय मानकरी; भर उन्हात शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *