बेंगळूर : राज्यात लॉकडाऊन वाढीबाबत चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी निर्यात व्यवसायांना परवानगी दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला नसल्याने योग्य निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.
राज्यात सध्या ७ जूनपर्यंत लॉकडाऊन आहे, आणि त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी “लॉकडाऊन संदर्भात कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मी सर्वांशी चर्चा करणार असल्याचे म्हंटले आहे. तसेच मुख्य म्हणजे निर्यात व्यवसायांना परवानगी देण्याचे मी ठरविले आहे. त्यामुळे गुरुवारपासून निर्यातभिमुख व्यवसायाला परवानगी दिली जाईल,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना मुख्यंमत्री म्हणाले की, वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संबंधित इतर विविध बाबींवर चर्चा केली जाईल आणि आज किंवा उद्या या लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल. “लॉकडाऊन वाढवून कडक उपाययोजना करण्यासाठी तज्ञांसमवेत चर्चा करू आणि त्यांच्या सूचना जाणून घेतल्यानंतर निर्णय जाहीर करू. दरम्यान, कोरोना पूर्णपणे नियंत्रणाखाली आलेला नाही, अजूनही ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta