खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवर गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत असलेल्या खोकीधारकाना नगरपंचायतीकडून खोकी हटवण्यासाठी नोटीसा पाठविली होती. सध्या जत – जांबोटी महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे.
त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे कारण पुढे करून रविवारीच खोकी हटाव मोहिमेला सुरूवात झाली.
जांबोटी क्राॅसवर जवळपास १०० अधिक खोकीधारक आपला व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवितात. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे खोकीधारकांचा व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जीवन जगण्याचा प्रश्न उभा होता. अशा संकटात असतानाच रविवार पासुन खोकी हटाव मोहिम तत्यांच्या पाठीमागे हात धुवून पाट लागली. शेवटी सोमवारी जांबोटी क्राॅसवरची सर्वच खोकी उधळुन लावण्यात आली.
आदी सुचना केल्याप्रमाणे खोकी धारकानी रविवारपासुनच आपले साहित्या गोळा करण्यास सुरुवात केली. सोमवारीही खोकीधारकानी
आपले साहित्य गोळा केले.
आता उद्यापासून खोकीधारकांचे काय?
आदीच कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात धंदा बंद होऊन रिकाम टेकडी दिवस गेले. त्यातच आता खोकीही गेली. त्यामुळे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला.
तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांच्याकडे अपेक्षा होती की खोकीधारकाना काहीतरी न्याय मिळवून देईल मात्र आतापर्यत कुणीच पुढे आले नाही. त्यामुळे खानापूरातील जांबोटी क्राॅसवरील खोकीधारकाना कोणीच वाली नाही, असे खोकीधारकांचे म्हणणे आहे.
याकडे सरकारने तरी लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी खोकीधारकातून होत आहे.