Sunday , September 8 2024
Breaking News

निरंजन देसाई यांच्याकडून खानापूर तालुका समितीला 50 पीपीई किट

Spread the love

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते निरंजन देसाई यांनी खानापूर तालुका समितीला 50 पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत.
मंगळवारी शिवस्मारक येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सरदेसाई यांनी तालुका समितीचे सरचिटणीस गोपाळ देसाई यांच्याकडे पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. यावेळी बोलताना देसाई यांनी खानापूर तालुक्यात युवा समिती व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोरोना काळात विविध प्रकारची मदत करण्यात आली असून यापूर्वीही समितीतर्फे गरजूंना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले होते तसेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही रुग्णांना उपयोगी ठरले आहेत. येणार्‍या काळातही समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत यामध्ये युवावर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे मत व्यक्त केले.
युवा समिती खानापूरचे अध्यक्ष धनंजय पाटील, गोपाळ पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पांडुरंग सावंत, रणजित पाटील, रामचंद्र पाटील, सदानंद पाटील, किरण पाटील, पिंटू नवलकर, विनायक सावंत, अनंत झुंजवाडकर, राजू पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, विनोद वीर, ज्ञानेश्वर सनदी, विशाल बुवाजी आदी यावेळी उपस्थित होते. ज्यांना पीपीई किटची गरज आहे त्यांनी गोपाळ देसाई किंवा विनायक सावंत यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *