खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षांपासून खानापूर- रामनगर रस्त्याचे काम रखडले. त्यामुळे या भागातील ४० खेड्यातील नागरीकांना त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात भाजपतर्फे खासदार अनंतकुमार हेगडे, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजप नेते शंकरगौडा पाटील, विठ्ठल हलगेकर यांनी रस्त्याचे काम व्हावे यासाठी प्रयत्न केले.
यावेळी १० कोटीचा निधी मंजुर केला. यामध्ये पॅच वर्कसाठी ४ कोटी ९२ लाख रूपये हा करंबळ ते रामनगरपर्यंतच्या रस्त्यासाठी मंजुरी मिळाली आहे.
याबाबत तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही रास्तारोको करून याबाबत आवाज उठविला.
नुकताच माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांनीही भाजप नेते शंकरगौडा पाटील यांच्याकडे याबाबत भेट घेतली. तसेच खानापूर युवा समितीनेही आंदोलन केले. या सर्वाची दखल घेऊन शुक्रवारी खानापूर-रामनगर रस्त्याच्या पॅचवर्काला प्रारंभ केला.
त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न तात्पूरता तरी दुर करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, तानाजी गोरल आदीनी पॅच वर्कची पाहणी केली. त्यामुळे या भागातील ४० खेड्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. आता यापुढे तरी खानापूर-रामनगर रस्त्यावरून बससेवा सुरूळीत होऊन प्रवाशीवर्गाची तसेच विद्यार्थी वर्गाची सोय होणार आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …