खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने डॉक्टर दिनाचे औचित्य साधून खानापूर सरकारी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना गौरवचिन्ह व गुलाबाचे पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉक्टरांच्या प्रति खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजीव नांद्रे, डॉ.नारायण वड्डीन, डॉ.रमेश पाटील, राजश्री नेसरीकर, तसेच युवा समितीचे सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, राजू पाटील, अनंत झुंजवाडकर, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, सचिन साळुंके उपस्थित होते.
डॉक्टर राजश्री नेसरीकर यांनी युवा समितीचे आभार मानले.