खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड ग्राम पंचायत हद्दीतील विविध गावात सीसी रोड व गटारी आदी विकासकामे करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांनी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या निवासस्थानी भेटून देण्यात आले.
यावेळी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी निवेदनाचा स्विकार करून मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, इदलहोंड ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून तुम्ही केलेल्या कार्याबद्दल सत्कारही करू तसेच इतर समस्याही सोडवू असे सांगितले.
यावेळी इदलहोंड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष चांगप्पा बाचोळकर, उपाध्यक्ष रेखा गुरव, सदस्य उदय पाटील, यल्लाप्पा होसुरकर, लक्ष्मी नाईक, लक्ष्मी सुतार, तसेच माजी सदस्य यशवंत पाटील, नारायण पाखरे, उपस्थित होते.
यावेळी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, बाबूराव देसाई, माजी सभापती सयाजी पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta