
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेला रविवार दि. ११ डिसेंबर रोजी दुसऱ्या दहावी व्याख्यानमालेला विद्यार्थी वर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला.
चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलमध्ये ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिटर डिसोझा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या शुभारंभ प्रसंगी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे पदाधिकारी बी. जे. बेळगांवकर, एम. डी. पाटील, श्री. धबाले, संजीव वाटूपकर, श्री. कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवारी इंग्रजी, गणित, विज्ञान याविषयावर एकूण सात केंद्रावर व्याख्यानमाला पार पडल्या
यामध्ये हलशी केंद्रावर ९५ विद्यार्थी, नंदगड कन्या विद्यालयात ८५ विद्यार्थी, नंदगड एमजी हायस्कूल केंद्रावर ४५ विद्यार्थी, इदलहोंड केंद्रावर ८९ विद्यार्थी, जांबोटी २५१ विद्यार्थी, गंदिगवाड (कन्नड) केंद्रावर ८३ विद्यार्थी, देवलती (कन्नड) केंद्रावर ९५ विद्यार्थी उपस्थित होते.
दुसऱ्या रविवारच्या दहावी व्याख्यानमालेला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी पीटर डिसोझा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिली परीक्षा आहे. या परीक्षेत यश संपादन केला तर आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. तेव्हा व्याख्यानमालेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्या, असे आवाहन केले.
Belgaum Varta Belgaum Varta