खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेत खानापूर लायन्स क्लबच्यावतीने इयत्ता दुसरी ते पाचवी पर्यतच्या विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेतील विजयी स्पधर्काना लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. हम्मणावर, डॉ. राधाकृष्णन हेरवाडकर, पदाधिकारी अजित पाटील आजी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. डी. ई. नाडगौडा होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, लायन्स क्लब हे एक सामाजिक पातळीवरील उच्च दर्जाचे क्लब आहे. या क्लबचा मुळ उद्देश मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे आहे. यासाठी लायन्स क्लब ऑफ खानापूर या क्लबच्या पदाधिकारी वर्गाने चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले. त्यामुळे विद्यार्थी वर्गात आत्मविश्वास वाढविला.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सचिव डॉ. डी. ई. नाडगौडा, संचालक एफ. एम. पाटील, डॉ. एन. एल. कदम, डॉ. हेरवाडकर, तसेच शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी समर्थ इंग्रजी स्कूलच्या प्राचार्या सौ. दिव्या नाडगौडा यांनी स्वागत करून शेवटी आभार मानले.