Tuesday , March 3 2026
Breaking News

गर्लगुंजी लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी संस्थेकडून २ लाखाची देणगी सुपूर्द

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार करण्यात येत असल्याने श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी संस्थेच्या मुख्याधिकारी विरेंद्र हेगदे यांच्या सुचनेवरून गर्लगुंजी लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी दोन लाख रूपयाचा धनादेश खानापूर श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी योजनेचे अधिकारी प्रदिप शेट्टी, संदिप नाईक, सदानंद आर यांच्याकडून श्री लक्ष्मीमंदिर जीर्णोद्धार कमिटी अध्यक्ष व माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील, सेक्रेटरी जयसिंग पाटील व कमिटी सभासदांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत, ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुरेश मेलगे, सदस्य हणमंत मेलगे, परशराम चौगुले, सदस्या सौ. वंदना पाटील, सौ. रेखा कुंभार, कृषीपत्तीन अध्यक्ष सुभाष पाटील, संचालक राजू सिध्दाणी, रमेश दावतार, नंदू निट्टूरकर, संतोष पाटील, भरमाणी चौगुले, सोमनाथ यरमाळकर, चंद्रकांत भातकांडे, चन्नापा मेलगे, शिवाजी कोलकार, भरत गोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी योजनेने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *