बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकावरून उसळलेल्या दंगली संदर्भातील खटल्याच्या आज गुरुवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी 8 कार्यकर्ते गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकावरून उसळलेल्या दंगली संदर्भातील खटला गेल्या 6 वर्षापासून सुरु आहे. या खटल्याच्या फक्त तारखांवर तारखा पडत असून अंतिम निकाल अद्याप प्रलंबित आहे. आज झालेल्या न्यायालय सुनावणीप्रसंगी अर्जुन नागाप्पा गोरल, चांगदेव सातेरी देसाई, अनंत भरमाजी चिट्टी, टी वृषसेन, चंद्रकांत पाटील, संभाजी बाबुराव हट्टीकर, शिवाजी शंकर कदम, सुनील निंगाप्पा धामणेकर, परशराम मारुती कुंडेकर, श्रीकांत शिवाजी नांदुरकर, गणेश उर्फ तांबडा नारायण पाटील, राहुल मारुती कुगजी, जयंत बाबू पाटील, नागेश बोबाटे, सुनील रामा कुंडेकर, राहुल महादेव कुगजी, केशव कृष्णा हलगेकर, सातेरी येल्लू बेळवटकर, गणपती इरप्पा पाटील, नामदेव विठ्ठल नायकोजी, रामचंद्र ईश्वर बागेवाडी, केशव महादेव पाटील, रमेश जयराम धामणेकर, रामचंद्र नारायण कुगजी आणि सतीश मनोहर कुगजी हे उपस्थित होते.
