खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक आज जांबोटी क्रॉस येथील निवृत्त सैनिक संघटनेच्या कार्यालयात झाली.
संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी अध्यक्षपद भूषविले. उपाध्यक्ष हनुमंत गुरव यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी 2019 च्या कुस्ती आखाड्याचा जमा खर्च खजिनदार तानाजीराव कदम यांनी सादर केला.
पुढील कुस्ती आखाडा घेण्याविषयी चर्चा झाली. कार्याध्यक्ष लक्ष्मण बामणे, डी. एम. भोसले, रामा खांबले, अर्जुन जांबोटी, राजाराम पाटील, सुरेश पाटील, तुकाराम बिरजे, पावलो फर्नांडिस, राजाराम गुरव, निवृत्ती पाटील, मर्याप्पा पाटील, आबासाहेब दळवी, अमोल बेळगावकर, परशराम पाटील, चंद्रकांत बरुकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta