खानापूर : खानापूर तालुक्यातील सुरापूर या गावातील शिवराय यल्लाप्पा आयोटी या शेतकऱ्याला कर्जाचा भार सहन न झाल्याने विष प्रश्न करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
विविध बँका आणि सहकारी पतसंस्थांमधील कर्जबाजारीपणाला कंटाळून सदर शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. केव्हीजीबी बँक लिंगनमठ शाखा, कृषी पत्तीन सहकारी संघ, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एसबीआय बँक अशा विविध ठिकाणाहून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन शेती व्यवसायात गुंतविले होते. शेतपिकाला योग्य भाव न मिळाल्याने तसेच इतर कौटुंबिक समस्यांनी ग्रासल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने शेतातच विष पिऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे.
शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा आणि २ मुली असा परिवार आहे. नंदगड पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी इतर शेतकऱ्यांनी केली आहे.