खानापूर : राणी चन्नम्मा विद्यापीठ व बेळगाव जिल्हा या दोन स्तरावर “सामान्य ज्ञान परीक्षा 2023 “आयोजित 9/1/2023 रोजी महाविद्यालयात करण्यात आले होते.
ही परीक्षा पदवी पूर्व व पदवी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये दहा पेक्षा जास्त कॉलेजमधून तीनशे विद्यार्थी सहभाग घेतले होते.
या उद्घाटन समारंभासाठी माजी प्राचार्य एस. जी. सोन्नद, फोरमचे अध्यक्ष प्राध्यापक पी. व्ही. कार्लेकर व प्राचार्य डॉक्टर जे. के. बागेवाडी व आई क्यू एसी. प्राध्यापक व्ही. एम. तीरलापूर उपस्थित होते.
सदर परीक्षा मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना आणि वाणिज्य प्राध्यापक व पदवीधर मंच यांच्यातर्फे आयोजन केला होता.
या परीक्षेसाठी प्राध्यापक संदीप पाध्ये, प्राध्यापक वाय. एस. धबाले व श्रीमती बनोशी मॅडम, जी. एम. मिराशी, श्री. एस. एल. सातार्डेकर व अन्य प्राध्यापक वर्गणी विशेष प्रयत्न केले हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला.