खानापूर स्थायी कमिटी बैठकीत चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील कोणत्याही सरकारी इमारतीच्या बांधकामासाठी नगरपंचायतीकडून इमारत बांधकामासाठी परवानगीची गरज नाही, अशी माहिती नगरपंचातीच्या अभियंत्याकडून नगरपंचातीच्या स्थायी कमिटीच्या बैठकीत सांगण्यात आले. सध्या खानापूर शहरात सरकारी हाॅस्पिटलच्या बांधकाम सुरू आहे. यावरून बैठकीत चर्चा झाली.
खानापूर नगरपंचातीच्या स्थायी कमिटीची बैठक बुधवारी दि. ११ रोजी नगरपंचातीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष नारायण मयेकर, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी व चीफ ऑफिस आर. के. वटार होते.
बैठकीला नगरसेवक रफिक वारेमनी, आप्पया कोडोळी, विनोद पाटील, विनायक कलाल, नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी, जया बुतकी, सहरा सनदी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यानी केले. तर चीफ ऑफिसर आर. के. वटार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी खानापूर नगरपंचातीच्या हद्दीतील सर्वे नंबर मधील, अथवा गावठाण मधील घराच्या इमारत बांधकामासाठी शहरातील नागरिकांना नगरपंचायतीला हेलपाटे मारावे लागतात. यात गरीब नागरिकांना घर बांधकामासाठी परवानगी वेळेत मिळत नाही. तर श्रीमंताना परवानगी दिली जाते. यावरून नगरसेवकांनी एकच आवाज उठविला. जादा रक्कम घेऊन काहीना लगेच घर बांधणी परवानगी दिली जाते. असे आरोपही करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनोद पाटील यांनी सर्वाना एकच टॅक्स घर बांधणीसाठी घ्यावा. जादा रक्कम देणाऱ्याना तेवढीच घर बांधणीसाठी परवानगी देणे चुकीचे आहे. कारण घर बांधणी परवानगीसाठी २५ ते ३० हजार रुपये वसुल केले जातात. ही रक्कम गरीबांना झोपणार नाही. तेव्हा सर्वाना ठराविक रक्कम घेऊन घर बांधणीसाठी परवानगी द्यावी, अशी चर्चा करण्यात आली.
प्रारंभी नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी बैठकीत नगरसेवकाना देण्यात येणारा अहवाल हा मराठी व कन्नड मधुन द्यावा. नगरपंचायत केवळ कन्नड भाषेतून अहवाल देते. ते मराठी भाषिक नगरसेवकांना समजणार नाही.
पूर्वी नगरपंचायतीकडून मराठी व कन्नड मधून बैठकीत अहवाल देत होते. यापुढे कन्नड बरोबर मराठी भाषेतून ही अहवाल द्यावा, अशी मागणी केली.
नगरसेवक विनायक कलाल यांनी दर दोन महिन्यातून एकदातरी शहरातील पाण्याचा टाक्या स्वच्छ कराव्यात, अशी मागणी केली.
लक्ष्मी नगरमधील कंपाऊंड हे नगरपंचातीच्या हद्दीतून गेले आहे, अशी तक्रार रफिक वारेमनी यांनी केली. तेव्हा नगरपंचायतीने मोजणी करावी.
राजश्री तोपिनकट्टी यांनी पाणी पुरवठा सुरळीत करावा. पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवाव्यात, अशी मागणी केली.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.