खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मुख्यमंत्री अमृत नगरोत्थान योजनेंतर्गत नगरविकास टप्पा चार मधील रस्ते व गटारी कामे करण्यास गेल्या दोन महिन्यापासून विलंब झाला.
याबाबत नगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवक आपय्या कोडोळी, रफिक वारेमनी आदीनी नगरविकास खात्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ठेकदाराच्या बेजबाबदारीमुळे विकास कामात खंड पडला. त्याच्यावर कारवाईची मागणी करताच सोमवारी दि. ९ रोजी खानापूर शहरातील मुख्यमंत्री अमृत नगरोत्थान योजनेंतर्गत १ कोटी ८५ लाख्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नारायण मयेकर व स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर यांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी आमदार डाॅ. निंबाळकर, नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटार, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक तोहिद चांदखण्णावर, लक्ष्मण मतदार, आप्पया कोडोळी, विनायक कलाल, नारायण ओगले, हणमंत पुजारी, विनोद पाटील, मजहर खानापूरी, महमद रफिक वारेमनी, नगरसेविका मिनाक्षी बैलुरकर, लता पाटील, शोभा गावडे, जया भुतकी, राजश्री तोपिनकट्टी, फातिमा बेपारी, सहारा सनदी, आदींसह नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रेमानंद नाईक यांनी प्रास्ताविक केले. तर चीफ ऑफिसर आर. के. वटार यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला शहरातील नागरिक उपस्थित होते.