खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती महत्वपूर्ण बैठक उद्या गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजता शिवस्मारकात बोलावण्यात आली आहे.
बैठकीत येत्या 17 जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा दिन गांभिर्याने पाळण्यासंदर्भात तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. तरी तालुक्यातील मराठी भाषिक जनतेने व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म. ए. समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे व सरचिटणीस सीताराम बेडरे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta