खानापूर : खानापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा राजरोजपणे चालू आहे. एकीकडे प्रशासनाने वाळू उपसावर बंदी घातली आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या कृपाशीर्वादाने बेकायदा वाळू उपसा चालू आहे.
मणतुर्गा येथील हालात्री नदीपात्रात खुलेआम बेकायदा वाळू उपसा चालू आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी गढूळ होत आहे. हे गढूळ पाणी जनावरांना पिण्यालायक रहात नाही. तसेच नदीकाठची शेती ही नदीच्या पाण्यावर पिकविली जाते पण वाळू उपसामुळे गढूळ झालेले पाणी शेतात सोडले तर पिकास नुकसानीचे ठरत आहे. त्यामुळे संबंधित खात्याने बेकायदा वाळू उपसावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी शेंडेगाळी, मणतुर्गा परिसरातील शेतकरी करीत आहेत.