खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज 16 जानेवारी रोजी खानापूर शहरात पत्रके वाटून 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. तर संध्याकाळी निडगल व गर्लगुंजी येथे खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात आली.
17 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता हुतात्म्यांना अभिवादन करून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा, असे आवाहन म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सचिव सीताराम बेडरे, माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, ब्रम्हानंद पाटील, संतोष पाटील, सूर्याजी पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta