खानापूर (प्रतिनिधी) : घार्लीतील (ता. खानापूर) तीन महिलांचा धारवाड रामनगर महामार्गावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच तोपिनकट्टी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, लैला शुगर्सचे एम डी सदानंद पाटील, संचालक चांगापा निलजकर आदींनी घार्ली येथील मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन केले.
या अपघातात निधन पावलेल्या कल्पना भरमाणा गावडे, पार्वती गावडे, व पार्वती पोडसेकर यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० हजार रूपयाची आर्थिक मदत देऊ केली.
धारवाड रामनगर महामार्गावरून चालत जात असताना मागुन चार चाकी वाहनाने धडक दिल्याने निष्पाप महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खातून सावरण्यासाठी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर यांनी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य केले.
Belgaum Varta Belgaum Varta