खानापूर (प्रतिनिधी) : एम. के. हुबळी येथे येत्या दि. २८ रोजी भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला खानापूर तालुक्यातील जवळपास १५ हजार भाजपच्या कार्यकर्त्यानी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन राज्य प्रधान कार्यदर्शी महेश टिंगीनकाई यांनी खानापूर येथील शिवस्माकात भाजपच्या सभेत बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष संजय कुबल होते. तर व्यासपीठावर भाजपा जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, सुभाष पाटील, जयप्रकाश, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जोतिबा रेमाणी, विजय कामत, धनश्री सरदेसाई, वासंती बडगेर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले की, मे महिन्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. यासाठी खानापूरचा आमदार हा भाजप झाला पाहिजे. तो ही होणार यात तिळमात्र शंका नाही.
भाजपचे तिकिट कुणालाही मिळू दे सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून भाजपचा आमदार होण्यासाठी आतापासून रणांगणात उतरा, असे आवाहन केले
यावेळी संजय कुबल यांनीही कार्यकर्त्याना मार्गदर्शन करत येत्या दि. २८ रोजी राष्ट्रीय नेते अमित शहा यांच्या सभेला १५ हजार भाजपचे कार्यकर्त्यांनी उपस्थित दाखविली पाहिजेत. खानापूर येथून दुपारी १२ वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी दीड वाजता एम. के. हुबळी येथे हजर राहिले आहे. यावेळी खानापूर, बैलहोंगल, कित्तूरसह बेळगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
आभार बसु सानिकोप यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta