खानापूर : खानापूरमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी करण्यात आली आहे. एक कोटी खर्चून विद्यार्थी वसतिगृह बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण इमारत नादुरुस्त झाली आहे. इमारती बाजूने असलेली भिंत देखील कोसळलेली आहे. त्यामुळे वसतिगृह म्हणजे दारुड्यांचे ठिकाण झाले आहे. तरीही इमारत परत एकदा दुरुस्त करून द्यावी व येथील गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी ही विनंती आहे. इमारतीची दुरुस्ती एक आठवड्याच्या आज सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खानापूर यांच्यावतीने करण्यात आली आहे. असे नाही झाले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खानापूर यांच्यावतीने करण्यात आलेला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta