खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक 26 जानेवारी रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते.
व्यासपीठावर माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलीकमामा चव्हाण, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सचिव सीताराम बेडरे, मारुती परमेकर, विलासराव बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुका समितीची विस्तृत कार्यकारिणी लवकरात लवकर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तालुक्यात संपर्क दौरा करून इच्छुक कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत सामील करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. म. ए. समितीच्या बळकटीसाठी सर्व स्तरातील युवा कार्यकर्त्यांना समितीच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे गरजेचे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
बैठकीत समिती नेते पांडुरंग सावंत, आबासाहेब दळवी, गोपाळराव पाटील, निरंजन सरदेसाई, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण आदींनी आपले विचार मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta