
खानापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी एम. के. हुबळी येथे “विजय संकल्प” यात्रा भाजपच्या हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत पार पडली.
या विजय संकल्प यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, जगदिश शेट्टर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपा राज्याध्यक्ष नवीन कुमार कटिल, आदी मंत्री उपस्थित होते.
यावेळी खानापूर भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. सरनोबत यांनी अमित शहा यांना “स्मार्ट सिटी इज बीइंग स्मार्ट”, “डाएट ऍड मी” तसेच खानापुरात आवश्यक सुधारणांबद्दल एक पुस्तिका दिली. या सुधारणांबाबत शहा यांनी विचार करू असे आश्वासन दिले.
त्यावेळी अमित शहा व डॉ. सोनाली सरनोबत यांच्यात खानापूर तालुक्यातील भाजप संघटनेच्या बळकटीविषयी चर्चा केली.
Belgaum Varta Belgaum Varta