खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील श्री रामलिंगेश्वर मंदिर व श्री रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार विधी व उद्घाटन सोहळा शुक्रवारी दि. ३ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग देव ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत पाटील राहणार असुन श्री रामलिंगेश्वर मंदिराचे उद्घाटन भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर व आमदार डॉ. निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.
गाभाऱ्याचे उदघाटन भाजप नेते खासदार इराणा कडाडी व माजी एमएलसी महांतेश कवठगीमठ यांच्याहस्ते होणार आहे. कळसारोहण पिरयोगी भयंकारनाथजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, यांच्या हस्ते होणार आहे.
गाभाऱ्याचे पुजन बेळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संजय कुबल, भाजप युवा नेते पंडित ओगले हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते विविध देव देवतांचे फोटो पुजन करण्यात येणार आहे.
तरी श्रीक्षेत्र असोगा येथील श्री रामलिंगेश्वर मंदिर व श्री रवळनाथ मंदिराच्या उद्घाटनास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन असे असोगा येथील श्री रामलिंग देव ट्रस्ट यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta