खानापूर (प्रतिनिधी) : ऐन उन्हाळ्यात आग लागण्याचे प्रकार खानापूर तालुक्यात सुरूच आहेत. कधी काजूच्या बागेला आग लागल्याची घटना घडली. तर कधी जंगलाला आग लागून नुकसान झाले आहे.
अशाच प्रकारे चापगावात (ता. खानापूर) येथे रविवारी दि. १२ रोजी भर दुपारी शेतातील घराच्या बाजुला असलेल्या गवत गंजीला आग लागून दोन ट्रॅक्टर गवत जळुन खाक झाले आहे. यात शेतकरी मारूती मष्णू कदम यांचे हजारो रूपयाचे नुकसान झाले आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शेतकरी मारूती मष्णू कदम याचे शेतातच घर असुन जनावरे शेतातच राहतात. त्यामुळे जनावरासाठी घराजवळ च गवतगंजीचा साठा केलेला होता. मात्र रविवारी भर दुपारी अचानक गवतगंजीला आग लागून प्रचंड नुकसान झाले. त्याचबरोबर जवळ असलेली काजूची झाडे जळुन काजु पिकाचे नुकसान झाले.
आग नेमकी कशी लागली हे अद्याप कळू शकले नाही. यावेळी आगीने रौद्ररूप धारण करतात आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भर दुपारी आगीने पेट घेतल्याने आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण गवतगंजी जळून खाक झाली.
शेतकऱ्यांच्या गवतगंजीला आग लागून नुकसान झाल्याने चापगाव गावातुन हळहळ व्यक्त होत.
Belgaum Varta Belgaum Varta