खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचातीकडून खानापूर शहरातील बेळगांव पणजी महामार्गावरील दुकानाचे स्टॅन्ड फलक पूर्वकल्पना न देताच गुरूवार दि. २३ रोजी काढण्यास प्रारंभ करताच नेल्सन बुक स्टॉलचे मालक जाॅर्डन गोन्सालवीस आणि खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटार यांच्यासह कर्मचाऱ्यांत वादावादीचे प्रसंग घडून आले.
खानापूर नगरपंचायतीने दुकानदाराचे स्टॅन्ड फलक काढण्याची नोटीस अथवा सुचना केली नाही असे म्हणणे नेल्सन बुक स्टॉलचे मालक जाॅर्डन गोन्सालवीस यांचे म्हणणे आहे.
एकीकडे खानापूर शहरातील बाजारात दुकानदारानी फुटपाथ आक्रमण करून फुटपाथवर दुकान थाटली आहेत . त्यामुळे बाजारात रहदारीला आडथळा होत आहे. याकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे पणजी बेळगाव महामार्गावरी दुकानदाराचे स्टॅन्ड फलक काढण्यात नगरपंचायतीला जास्त गरज वाटते काय?, असा सवाल करत जाॅर्डन गोन्सालवीस व चिफ ऑफिसर यांच्यात वादावादी सुरू झाली.
अखेर जाॅर्डन गोन्सालवीस यांनी दुकानचा स्टॅन्ड फलक काढण्यास साफ नकार दिला.
यावेळी नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटार, प्रेमानंद नाईक, अभियंते व सफाई उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta