खानापूर : एका राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे फोटो असलेले घड्याळ, प्लास्टिक पिशव्यासह त्यामध्ये किंमती साड्या, भिंतीवरचे घड्याळ, दारू असलेले एक वाहन खानापूर शहरात लोकमान्य भवनच्या बाजूला थांबलेले वाहन पोलिसांनी संशयाने तपासणी केली असता, त्यामध्ये बेकायदेशीररित्या वाहतूक करणारे साहित्य आढळून आल्याने निवडणूक आयोगाच्या पथकाने व पोलिसांनी ताब्यात घेऊन सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कारवाई केली व मुद्देमालासह वाहन जप्त केले आहे.
या वाहनांमध्ये जवळपास 1 लाख 54 हजाराच्या
280 साड्या, 1350 रुपये किमतीची 9 घड्याळे, व 48 हजार 360 रुपयाची दारू बॉटल्स यासह 5 लाख किमतीचे टाटा एस वाहन असा 7,03,710 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, खानापुर शहराच्या मुख्य रस्त्यावर लोकमान्य भवन समोर एक मालवाहू वाहन टाटा एस मिनी मालवाहन केए 22 डी 24 22 उभे होते. यामध्ये वरील वस्तू भाजप नेते दिलीप कुमार यांच्या नावे असलेले फोटो भाजप पक्षाचे चिन्ह असलेल्या पिशव्या यामध्ये आढळून आल्या आहेत. सदर मुद्देमाल संगप्पा मल्लिकार्जुन कुडची, नामक व्यक्तीने बेळगाव बॉक्साईट रोड येथून वाहन चालक लियाकत अहमद बशीर नदाफ वय 31 यांच्या वाहनातून आणल्या असल्याची माहिती यावेळी चालकांनी दिली. पोलीस तसेच निवडणूक आयोगाच्या पथकाने सदर वाहन व चालकाला ताब्यात घेऊन मुद्देमालासह कायदेशीर गुन्हा नोंद केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta