
खानापूर : नगरपंचायतीत अनागोंदी कारभार चालू आहे. नेहमी या- ना त्या कारणावरून चर्चेत असलेली नगरपंचायत शहराला पाणीपुरवठा करण्यात कुचकामी ठरलेली आहे. नगरपंचायतीच्या उंबरठ्यावर असलेल्या शाहूनगर (डोंबारी वसाहत) परिसरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे तेथील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वारंवार मागणी करून देखील संबंधित नगरसेवक व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत कार्यालयासमोर नगरपंचायतीचे जलकुंभ बसविलेले आहे पण या जलकुंभाला कधीच पाणी येत नाही, अशी या भागातील नागरिकांची तक्रार आहे.
जनतेच्या सोयीसाठी नगरपंचायतीसमोर जलकुंभ बसविण्यात आले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून कुचकामी बनली आहे. 500 लिटर क्षमता असलेल्या जलकुंभात कधीतरी पाणी सोडले जाते ते काही वेळातच संपते. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच जलकुंभ स्वच्छच केले जात नाही त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नगरपंचायतीच्या या कारभाराबाबत खानापूर शहरातील नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta