खानापूर : खानापूर तालुका गंगवाळी येथील शंकर कुरूमकर यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी खानापूर तालुक्याचा आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर या उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना शंकर कुरूमकर म्हणाले की, मागील पाच वर्षात माननीय आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापुरात विकासाची गंगा आणली. काँग्रेस पक्ष हा तळागाळातील जनतेला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या विकास कार्यावर प्रभावित होऊन मी व माझे सहकारी आज काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करीत आहोत. यापुढे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी राहू व विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून आणू व डॉ. अंजली निंबाळकर यांना पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवू असा निर्धार श्री. शंकर कुरूमकर यांनी यावेळी केला.
कॉंग्रेस प्रवेश घेतलेल्यांची नावे अशी, राहुल पाटील, अमित पाटील, इंद्रजीत पाटील सर्व अल्लेहोळ, विठ्ठल घाडी, अरूण बेडरे – रूमेवाडी, ओंकार व भरमानी गुरव – लोकोळी, नामदेव मन्नोळकर, जोतीबा ओवूळकर – हडलगा, विलास निलजकर, परसराम चोलगी- यडोगा, कलाप्पा पाटील – ढोकेगाळी, गोविंद झुंजवाडकर – होनकल, प्रद्युम्न गुरव – लोकोळी, संजय कोळी – मंसापूर
दयानंद रजपूत – खानापूर, गोपाळ केळनेरी, सिद्धाप्पा बंडीवड्ड्रर, बिटाप्पा वड्डर बिदरभावी, शंकर नाईक कृष्णापूर, खंडोबा धोंड – देगाव, विष्णू गावडे – हुळंद, गंगाराम शंकर वड्डर – बेकवाड तसेच गंगवाळीच्या सर्व महिला मंडळ, अशा अनेकांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
Belgaum Varta Belgaum Varta