खानापूर : खानापुरात अवैद्य वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. खानापुरात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून दिवसाढवळ्या वाळू उपसा व वाळू वाहतूक राजरोसपणे केली जाते. पोलिसांना किंवा इतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी वाळू वाहतूकदार सुसाट वेगाने वाहने चालवितात. एखाद्या वेळेस वाहनावरील नियंत्रण सुटून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वाळू फिल्टर केल्यामुळे नदी नाल्याचे पाणी देखील दूषित झाले आहे. हे दूषित पाणी ऊस किंवा मिरची पिकाला देण्यायोग्य राहिलेले नाही त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर संक्रांत ओढवली आहे. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर तात्काळ संबंधित खात्याने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वन खात्याने व भूगर्भ खात्याने देखील या वाळू माफियांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. हेमाडगा रस्त्यावर आज रोजपणे विनापरवा वाळू वाहतूक सुरू असून वाहन चालक मागील आठवड्यात वन खात्याने तीओली जंगलात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकावर गुन्हा नोंद केला होता. परंतु खानापुरात दिवसाढवळ्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वन खात्याला व भूगर्भ खात्याला दिसत नाहीत का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta