खानापूर : अद्यावत सरकारी हॉस्पिटल आणि हायटेक बस स्थानकामुळे खानापूर शहराच्या वैभवत भर पडली आहे. 24 तास पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार अशा पायाभूत विकासासाठी प्रयत्न केले आहेत. यापुढेही खानापूरला बेळगावच्या धरतीवर स्मार्ट बनण्यासाठी नियोजन तयार करण्यात आले आहे. त्यासाठी जनतेने पुन्हा एकदा मला संधी द्यावी असे आवाहन आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केले आहे.
आपल्या निवडणूक प्रचारार्थ खानापूर शहरात भव्य रोडशो आणि पदयात्रेचे आयोजन केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्या नागरिकांशी संवाद साधत आहेत. नागरिकांमधून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta