खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषद व खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन खानापूर तालुका यांची संयुक्त बैठक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
यावेळी तिन्ही संघटनेच्या वतीने मुरलीधर पाटील यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव कदम, खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष अभिलाष देसाई, बार असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर घाडी, कुस्तीगर संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, म. ए. समितीचे चिटणीस एस एन बेडरे अँडवोकेट केशव कळेकर, ऍड. आनंदराव देसाई, रामचंद्र खांबले, राजाराम देसाई, अर्जुन देसाई, आबासाहेब दळवी, चांगाप्पा पाटील, जगन्नाथ बिरजे व आदीजन उपस्थित होते,
यावेळी समितीच्या निवडणूक फंडासाठी अनेकांनी देणग्या दिल्या, खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना 11501 रुपये रोख, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई 5001 रुपये रोख, चांगाप्पा पाटील (रिटायर्ड कॅप्टन) अकरा हजार एकशे अकरा रुपये, छत्रिय मराठा परिषद खानापूर तालुका यांच्यावतीने अकरा हजार एकशे एक रुपये, ऍड. ईश्वर घाडी अकरा हजार एकशे एक रुपये, सीमा सत्याग्रही कै. अप्पाजीराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री तानाजीराव कदम यांनी 51 हजार रुपयाची देणगी दिली, तर खानापूर तालुका को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव पाटील यांनी आपले वडील श्री. कृष्णा सातेरी पाटील उद्योजक यांच्या नावे पाच हजार एक रुपये तसेच दररोज 25 कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय करणार असल्याचे सांगितले.
यावेळी समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या समर्थनात ईश्वर घाडी, अभिलाष देसाई, चांगाप्पा पाटील, सुरेश पाटील, गोपाळराव देसाई, यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुस्तीगीर संघटनेचे सचिव रमेश पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta