Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूरात २५ मे रोजी चित्ररथ मिरवणूक!

Spread the love

 

खानापूर : शिवजयंती निमित्त चित्ररथ मिरवणूक दि. 25 मे रोजी खानापुरात काढण्यात येणार असल्याची माहिती खानापूर शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी लक्ष्मी मंदिर खानापूर येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली दिली.

यावर्षी शिवजयंती दिवशी निवडणूक आचार संहिता असल्याने शिवजयंती एक महिना पुढे ढकलण्यात आली होती. आता निवडणुका झाल्याने 25 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वा. राजा श्री शिव छत्रपती चौकातून शिवजयंती चित्ररथ मिरवणूकीची‌ सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी श्री महालक्ष्मी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ स्टेशन रोड खानापूर, श्री रवळनाथ सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ गुरव गल्ली खानापूर, श्री चव्हाटा लाठी लेझीम मेळा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ निंगापूर गल्ली खानापूरचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रथमतः सर्वांचे स्वागत श्री रवळनाथ शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी गुंडु तोप्पीनकट्टी यांनी केले. यावेळी संदीप आंगडी, राहुल सावंत, किरण तुडवेकर, अनंत सडेकर, सुरज गोरल, मोहन नंदगडकर, विनायक चव्हाण, राजू गुरव, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *