Thursday , September 19 2024
Breaking News

नवनिर्वाचित आमदार हलगेकरांनी घेतली कन्नड भाषेत शपथ; मराठी भाषिकांत नाराजी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा शपथविधी संपूर्ण तालुक्यात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. तालुक्यातील मराठी भाषिकांची मोठ्या प्रमाणात मते मिळवून विजय प्राप्त केलेल्या हलगेकर यांनी विधानसभेत मात्र कन्नडमध्ये शपथ घेत मराठी भाषिकांच्या भावना पायदळी तुडविल्या आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या शपथविधीची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. आमदारांच्या या कृतीमुळे मराठी मतदारातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवगर्जना या महानाट्याचे प्रयोग करून मराठी माणसांची मने जिंकलेल्या हलगेकरांनी कन्नड भाषेत शपथविधी घेतल्यामुळे ते कन्नड प्रेमी आहेत की पक्षाचा प्रोटोकॉल पाळत आहेत अशा काहीशा संभ्रमावस्थेत तालुक्यातील जनता आहे. खानापूर तालुका हा मराठी बहुभाषिक तालुका म्हणून ओळखला जातो. यापूर्वी समितीचे आमदार भगवा फेटा परिधान करून मराठीतूनच शपथग्रहण करीत होते. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत माजी आमदार प्रल्हाद रेमानी यांनी देखील ही प्रथा जोपासली होती. मात्र नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी मात्र मराठी भाषेला फाट्यावर मारत कानडीतून शपथ घेतली. विठ्ठलराव हलगेकर हे स्वतः मराठी भाषिक आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण देखील मातृभाषेतूनच झालेले आहे. ते स्वतः एका मराठी विद्यालयांमध्ये शिक्षकी सेवा बजावून सेवानिवृत्त देखील झालेले आहेत. विधानसभेत प्रवेश करत असताना भगवा फेटा परिधान करून कन्नड भाषेत शपथग्रहण केल्यामुळे मराठी भाषिक मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचा लिंटल भरणी कार्यक्रम संपन्न

Spread the love  खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी १४/०९/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *