Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर तालुक्यात पेरणी हंगामाला सुरूवात

Spread the love

 

खानापूर : यंदा वळीव पावसाने खानापूर तालुक्यात योग्य साथ दिली नाही. त्यामुळे खानापूर तालुक्यातील शिवारात भात पेरणीचे हंगामाला उशीरा सुरूवात झाली.

यंदा नांगरटणीची कामे पडून होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची वाट पाहात राहवे लागले. मे महिना संपत आला तरी पावसाने साथ दिली नाही. त्यामुळे धुळ वापा भात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी आल्या. शेवटी तालुक्याच्या काही भागात पेरणी हंगामाला सुरूवात झाली. मे महिन्याच्या अखेरीला तालुक्यातील भात पेरण्या संपविल्या जातात. यंदा मात्र भात पेरण्या आजुन चालु आहेत. नुकताच खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील कृषी खात्याच्या कार्यालयाकडून बियाणाचे वाटप करण्यात आले.
खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला सबसीडीवर इंटान आणि अभिलाषा व इतर बियाणे २०० रूपये सबसीडी देऊन बियाणाचे वाटप करण्यात आले.
खानापूर तालुक्यातील खानापूर, बिडी, जांबोटी, गुंजी आदी ठिकाणी कृषी खात्याकडून बियाणाचे वाटप केले जात आहे. तेव्हा खानापूर तालुक्यातील शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत
यंदा खानापूर तालुक्यात वळीव पावसाची म्हणावी तशी हजेरी झाली नाही. त्यामुळे यंदा शिवारातील नांगरटणीची कामे खोळंबून राहिली. शिवाय भात शिवारातील कामे ही योग्य झाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. तसेच शिवार स्वच्छ ही झाले नाहीत. ऊस व इतर पीकाना ही वळीव पाऊस न पडल्याने पीकाना पाण्याचा पुरवठा चांगला झाला नाही. सध्या पेरणी हंगामाला तालुक्यात जोरदार सुरूवात झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *