Sunday , September 20 2026
Breaking News

कार-दुचाकी अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू

Spread the love

 

हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील कोटबागीजवळ कारला भरधाव दुचाकीने मागून धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला. हुक्केरी-घटप्रभा राज्यमहामार्गावर कोटबागीजवळ संथगतीने जाणाऱ्या इंडिका कारला मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीचालक शिवानंद भुसगोळ जागीच ठार झाला.
हुक्केरीचे पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार व कर्मचारी मंजुनाथ कबुरी यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *