Sunday , December 22 2024
Breaking News

खानापूर कुस्ती आखाड्यात पै. सिकंदर शेखने दुहेरी पटावर पै. विशाल भोंडूला दाखवले अस्मान!

Spread the love

 

खानापूर :खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना व भाजप पक्ष यांच्यावतीने खानापूर मलप्रभा क्रीडांगणावर सोमवारी पार पडलेल्या कुस्ती आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महानभारत केसरी विजेता पै. सिकंदर शेख याने अवघ्या तेराव्या मिनिटाला दुहेरी पट काढत पै. विशाल भोडुला अस्मान दाखवले व हजारो कुस्ती शौकीनाची मने जिंकली.
तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. संदीप मोटेने पै. सुनिल फडतरे याच्यावर विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. कार्तिक काटेने पै. लक्ष्मण डागरवर एकलंगी डावावर विजय मिळवला. चौथ्या क्रमांकाची कुस्ती पै. संगमेश बिराजदार विजयी ठरला.

प्रारंभी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते आखाड्याचे पुजन करण्यात. तर विविध फोटोचे पुजन जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लैला शुगर्सचे एम डी सदानंद पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
यावेळी दीपप्रज्वलन होऊन कुस्त्याना प्रारंभ झाला.
यावेळी तालुका कुस्तीगीर संघटनेच्यावतीने नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा चांदीची गद्दा देऊन सत्कार करण्यात आला होता. मात्र हलगेकर हजर नसल्याने लैला शुगर्सचे एम डी सदानंद पाटील यांनी सत्कार स्विकारला. यावेळी तालुका कुस्तीगीर संघटना अध्यक्ष लक्ष्मण बामणे, माजी आमदार अरविंद पाटील, लैला शुगर्सचे एम डी सदानंद पाटील, तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कचेरी व इतर मान्यवराचा सत्कार करण्यात आला.
सुरूवातीला सुरू झालेल्या इतर कुस्त्यामध्ये आदिनाथ पै चापगाव, शरद पाटील पै कुसमळी, भरत पै येळ्ळूर, विश्वास पै बेळगुंदी, मुबारक पै. गंदिगवाड, दर्शन पै. कंग्राळी, किरण पै. मच्छे, सम्राट पै रणकुंडे, किपलिंग पै. बिडी, राजू पै. गंदिगवाड, कामेश पै कंग्राळी, पवन पै चिकदिनकोप, विनायक पै बेकवाड, पै हणमंत इंगळगी, पै दर्शन कंग्राळी आदी पैलवानानी चटकदार कुस्त्या करून कुस्ती शौकीनाची मने जिंकली.
यावेळी समिक्ष म्हणून कृष्णा चौगुले राशिवडे, व प्रकाश मजगावी तिर्थकुंडे यानी काम पाहिले. तर तालुका कुस्तीगीर संघटनचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे, उपाध्यक्ष हणमंत गुरव, सेक्रेटरी शंकर पाटील, यशवंत अल्लोळकर, जयवंत खानापूरकर, पांडुरंग पाटील, लक्ष्मण झांजरे, अमोल बेळगावकर, मल्लापा मारीहाळ, अर्जुन जांबोटी, अर्जुन देसाई, सदानंद हसुरकर व इतर सदस्यांनी कुस्त्या पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!

Spread the love  खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *