बेळगाव : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बेंगलोर तालुका खानापूर घटक खानापूरच्या वतीने शनिवार दिनांक 3 जून 2023 रोजी केदार मंगल कार्यालय फिश मार्केट समोर खानापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय व चांगल्या पद्धतीचे कार्य केलेले आहे त्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. उत्तम कार्य केलेल्या कार्याची दखल घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांतिकारी कार्य केलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन खानापूर तालुक्यातील शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे त्यामध्ये सौ. ललिता एस. सुभेदार सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा लोंढा तालुका खानापूर जिल्हा बेळगांव, सौ. सविता राऊत सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा हेब्बाळ तालुका खानापूर जिल्हा बेळगाव आणि सौ. जयललिता पाटील यांचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल सोमाना हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजपचे तालुकाप्रमुख संजय कुबल, प्रमोद कोचेरी सदानंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य धनश्री सरदेसाई, खानापूर तालुक्याच्या बि. ई. ओ. तसेच शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव, पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta