खानापूर : मुळचे गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे सुपूत्र व सध्या कोल्हापूर येथील रहिवाशी शामराव व्यंकट देसाई हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र पोलीस खात्यात सेवा बजावत असून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली आहे. चार वर्षांपूर्वीच त्यांना शिपाई पदावरून हवालदार पदी बढती मिळाली होती.
नुकताच त्यांना पुनः बढती मिळाली असून पोलीस निरीक्षक (पीएसआय) पदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
त्यांना मिळालेल्या या बढतीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पीएसआय शामराव देसाई हे गर्लगुंजी येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्याचे प्राथमिक शिक्षण गर्लगुंजी उच्च प्राथमिक मराठी शाळेत झाले असुन त्याचे माध्यमिक शिक्षण ज्योतिराव फुले विद्यालयात पूर्ण झाले असुन ते उत्कृष्ट खोखो पटू होते. त्याचे बारावी पर्यंतचे शिक्षण ज्योति ज्युनियर काॅलेज बेळगाव येथे झाले आहे. बारावी नंतर त्यांनी महाराष्ट्र पोलिस खात्यात भरती होऊन उत्कृष्ट सेवा बजावली असुन त्या सेवेचे फळ म्हणून ते गर्लगुंजी गावात पीएसआय पदा वर गेलेले पहिले अधिकारी आहेत.
शामराव देसाई हे मच्छे मराठी हायर प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक एन. व्ही. देसाई व तोपिनकट्टी शाळेचे शिक्षक हणमंत देसाई यांचे बंधु होत.
शामराव देसाई महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यात पीएसआय पदावर अधिकारी म्हणून बढती झाल्याबद्दल त्याचे गर्लगुंजी गावासह खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.