खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर करण्यात आले.
येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी खालील प्रमाणे तारखा जाहिर करण्यात आल्या असुन येत्या ३१ जुलै रोजी कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये हलशी, बैलूर, गोल्याळी, नागुर्डा, या ग्राम पंचायती निवडणूका होणार आहेत, तसेच १ ऑगस्ट रोजी कसबा नंदगड, शिंदोळी, नेरसे, गुंजी, शिरोली, जांबोटी, निटटूर, इदलहोंड, आमटे, निलावडे, पारिश्वाड, हिरेमन्नोळी, कक्केरी, भुरूनकी, लिंगनमठ्ठ.
दि. २ ऑगस्ट रोजी हेब्बाळ, बरगांव, तोपिनकट्टी, गोधोळी, हलगा, करंबळ, रामगुरवाडी, कणकुंबी, लोंढा, बिडी, नंजीलकोडल, मोहिशेत, गंदिगवाड, इटगी, कोडचा या ग्राम पंचायतीच्या निवडणूक होणार.
दि. ३ ऑगस्ट रोजी नंदगड, चापगाव, लोकोळी, बिजगर्णी, कापोली के. जी., नागरगाळी, पारवाड, घोटगाळी, हिरेहट्टीहोळी, कर्तनबागेवाडी, मंग्यानकोप, केरवाड, मणतुर्गा, या ग्राम पंचायतीच्या निवडणूक होणार आहेत.
दि. ४ ऑगस्ट रोजी देवलती, हलकर्णी, बेकवाड, या ग्राम पंचायतीच्या निवडणूक होणार आहेत.
आता येत्या ३० महिन्याच्या कालावधीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्षाची खुर्ची मिळविण्यासाठी अनेक सदस्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
तालुक्यात ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या
निवडणूकीसाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta