खानापूर : खानापूर हेस्काॅम खात्याच्या कार्यालयात गेल्या दोन महिन्यापासून वीज बिल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
त्यामुळे नागरिकांतून वीज बिल भरण्यासाठी जादा खिडकीची मागणी होत होती.
मात्र १ जुलै पासून हेस्काॅम खात्याची वीज बिले भरण्यासाठी ऑनलाईनव्दारे, फोन पे, गुगल पे आदी सेवा उपलब्ध आहे. तेव्हा घरी बसल्याच हेस्काॅम खात्याची वीज बिले नागरिक भरू शकतात.
तेव्हा नागरिकांनी खानापूर हेस्काॅम खात्याच्या कार्यालयात येऊन वीज बिले भरण्यासाठी वेळ न घालविता घरी बसल्याच हेस्काॅम खात्याची वीज बिले ऑनलाईनव्दारे फोन पे, गुगल पे भरू शकतात याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खानापूर हेस्काॅम खात्याच्या कार्यकारी अभियंत्या सौ. कल्पना तिरवीर व सहाय्यक अभियंता नमित इजारी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta