खानापूर (प्रतिनिधी) : चापगाव (ता. खानापूर) गावच्या यडोगा रोडवरील रमेश तुकाराम पाटील यांच्या घरात चोरी झाल्याची घटना शनिवारी दि. ८ रोजी उघडकीस आली.
चोरट्यांनी पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असुन तिजोरी फोडली व त्यातील कपडे अस्ताव्यस्त करून काहीतरी सापडते काय याचा प्रयत्न केला असुन त्यामध्ये कानातील सोन्याचे मनी तसेच रक्कम असा जवळपास ८ ते १० हजार रूपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
शुक्रवारी सायंकाळी रमेश तुकाराम पाटील हे पाहुण्यांच्या घरी गेलेले पाहुन चोरट्यांनी याचा फायदा घेत शुक्रवारी रात्री घरच्या मागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला आणि चोरी केली.
घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली व पंचनामा केला.
चापगाव परिसरात महिनाभरात चोरीची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी जळगे रस्त्यावरील रोशन पाटील याच्या घरातही अशीच चोरी झाली होती. चापगाव परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने नागररिकांतून घबराट पसरली आहे.
तेव्हा पोलिस खात्याने चोरीच्या घटनाची दखल घेऊन यावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta