बेळगाव : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्ट्सच्या वतीने 5 डिसेंबरपासून ग्रामीण भाग मर्यादित भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे.
नरसेवाडी गायरान हलशी येथील मैदानावर स्पर्धा पार पडणार असून स्पर्धेतील विजेत्या संघाला सागर पाटील यांच्या स्मरणार्थ साहेब फौंडेशन बेळगावतर्फे 41 हजार रूपये व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांच्यावतीने 25 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. यासह प्रत्येक सामन्यातील सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आदी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धा ग्रामीण भागासाठी खुली असून इच्छुक संघानी आपली नावे संगीता स्वीटस, काकतीवेस रोड, बेळगाव, हॉटेल देशी कट्टा, स्वरूप प्लाझा, टिळकवाडी बेळगाव, सागर पान शॉप, बजाज शो रूम समोर खानापूर, ऋषी कम्युनिकेशन नंदगड किंवा लक्ष्मी शॉप हलशी येथे 3 डिसेंबरपर्यंत नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले असुन अधिक माहितीसाठी मिलिंद देसाई (7760688710), रघुनाथ देसाई (9611872848), वैभव देसाई (8496969572) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta