खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील तालुक्यातील सर्वात जुनी पीकेएस सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीची खानापूर तालुक्यात चुरशीची निवडणूक म्हणून सर्वाचे लक्ष लागून होते.
या निवडणुकीत दोन पॅनल तयार झाले होते. यामध्ये जुने संचालक असलेले पॅनल श्री माऊली देवी शेतकरी विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये मोठी चुरस होऊन चुरशीच्या मतदानात जुन्या संचालकांच्या श्री माऊली देवी शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय प्राप्त करत विजय मिळविला.
यामध्ये सामान्य कर्जदार गटातून गोपाळ मुरारी पाटील, पांडुरंग तुकाराम सावंत, राजू मारूती सिद्धाणी, सुभाष वसंतराव पाटील, हणमंत विठ्ठल मेलगे तर ब वर्ग कर्जदार गटातून संजय शंकर पाटील, तसेच अ वर्ग कर्जदार गटातून विनोद विठ्ठल कूंभार त्याचबरोबर महिला कर्जदार गटातून सौ. शामल संतोष पाटील,
सौ. महादेवी गुंडू सिद्धाणी तर कर्जदार अनूसूचीत जाती शिवाजी व्यंकाप्पा कोलकार व बिनकर्जदार गटातून शांताराम शि. मेलगे हे उमेदवार निवडून आलेले आहेत.
विजयी संचालकाचे सोसायटीच्या वतीने पुष्पहार घालून त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुलाल उधळून व फटाके फोडून श्री माऊली देवी शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.