खानापूर : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी (पीकेपीएस) संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच चुरशीने पार पडली. या निवडणुकीमध्ये श्री माऊली देवी विकास पॅनलला घवघवीत यश मिळाले. नंतर शनिवारी दि. २९ रोजी झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीमध्ये राजाराम मारुती सिध्दाणी यांची चेअरमनपदी निवड झाली व सौ. शामल संतोष पाटील यांचे व्हा. चेअरमन पदी निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल गर्लगुंजी गावासह खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
यावेळी माजी चेअरमन गोपाळ मूरारी पाटील, संचालक पांडुरंग तुकाराम सावंत, सुभाष वसंतराव पाटील, हणमंत विठ्ठल मेलगे
संजय शंकर पाटील, विनोद विठ्ठल कूंभार, सौ. महादेवी गुंडू सिद्धाणी, शिवाजी व्यंकाप्पा कोलकार, शांताराम शि. मेलगे आदी संचालक उपस्थित होते.
यावेळी चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संघाचे सेक्रेटरी सातेरी बिर्जे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी गावातील ग्राम पंचायत सदस्य, गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta