खानापूर : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅस वरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे कुणा अधिकार्याचे लक्ष नाही की, लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात खड्डे पडल्याने बस वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यामुळे बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. दिवसेंदिवस बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डे वाढत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना खड्ड्यातील खडुळ पाणी अंगावर उडाल्याने प्रवाशातून नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर बसस्थानकाच्या आवारात नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे काम चालु आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या आवारात ही खड्डे पसरले आहे.
याकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तेव्हा लोकप्रतिनिधी तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी खानापूर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डे त्वरीत बुजवावे, अशी मागणी सर्व थरातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta