खानापूर : खानापूर – असोगा रोडवर 600 ग्रॅम गांजा जप्त करून याप्रकरणी एकाला खानापूर पोलिसांनी अटक केली आहे.
खानापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक गिरीश एम. आणि गांजा विक्री करणाऱ्या दीपक कुधाळे याला अटक करण्यात आली. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 600 ग्रॅम गांजा आढळून आला. खानापूर पोलिसांनी लागलीच त्याला ताब्यात घेऊन पंचनामा करून 600 ग्रॅम गांजा जप्त केला. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. या कारवाईत खानापूर पोलिस ठाण्याचे हवालदार जयराम हणमन्नावर, ईश्वर जुनिगोळ, तहसीलदार कार्यालयाचे लिपिक करण देसाई आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta