खानापूर (प्रतिनिधी) : येत्या नविन वर्षात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहणार तेव्हा कॅनरा लोकसभा मतदारसंघातून भाजप व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारातून हालचालीना सुरूवात झाली आहे.
कॅनरा लोकसभा मतदारसंघात खानापूर हा मराठी भाषिक मतदार संघ समाविष्ट केला आहे. खानापूर तालुक्यातून भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी हे कॅनरा लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छूक असल्याची चर्चा खानापूर तालुक्यातून होत आहे.
यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले की, कॅनरा लोकसभा मतदारसंघात खानापूर, कित्तूर, हल्याळ, यल्लापूर, कारवार, शिर्शि, कुमठा, भटकळ, या तालुक्याचा समावेश आहे. या मतदार संघात काँग्रेसची सत्ता असली तरी भाजप पक्षाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी सहा वेळा उमेदवारी मिळविली. मात्र यावेळी खासदार अनंत कुमार हेगडे खासदारकीपासून लांब राहणार आहेत.
त्यामुळे कॅनरा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत आतापर्यंत खानापूर तालुक्याचे योगदान फार मोठे आहे. तेव्हा खानापूर तालुक्यातुन कॅनरा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळविण्यासाठी संधी आहे. या संधीच सोने करण्यासाठी खानापूर तालुक्यातून भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न ठेवले पाहिजे, खानापूर तालुका भाजपचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते गेली २५ ते २७ वर्षे भाजपचे जेष्ठ नेते आहेत. ते द्विभाषिक आहेत. आतापर्यंत त्यांनी भाजप पक्षासाठी अपार कष्ट घेतले आहेत. तेव्हा येत्या २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये कॅनरा लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मिळविण्यासाठी ते इच्छूक असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta