बेळगाव : नंदीहळी (ता. बेळगाव) येथे ग्रामपंचायत वतीने कन्नड शाळेच्या आवारात शहीद जवान विजयकुमार पाटील यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यंदा केंद्र सरकारतर्फे मेरी माटी मेरा देश हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत मंगळवार दि. 15 रोजी ध्वजारोहण करून शहीद जवान तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकाचे अनावरण करण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले होते. यानुसार नंदीहळी येथे नामफलकाचे अनावरण करण्यात आले नंदीहळी गावचे सुपुत्र विजयकुमार पाटील हे ८ मार्च 2004 रोजी भारतीय सैन्य दलामध्ये हवालदारपदी कार्यरत असताना अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटाच्या हल्ल्यात जम्मू-काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यामध्ये शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ सदर नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वीरपत्नी सुनीता पाटील, शहीद जवान विजयकुमार यांची कन्या अंकिता पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा सिंगेनावर, उपाध्यक्ष कुसुम पाटील, सहदेव बेळगावकर, चेतन पाटील, रामनाथ जाधव, नारायण पाटील, पीडिओ इंदिरा घाणगेर, संतोष कुरबर यांच्यासह आणि मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta